• HelpLine: +91-22-25385447

    "Emotional First Aid" helpline.

'बहुरंगी बहर' स्पर्धा २०१९

इयत्ता ७वी ते ९वी तील मुलांसाठी!

गेली ३ वर्षे तुफान यशस्वी ठरलेल्या 'बहुरंगी बहर' स्पर्धेचं हे चौथे वर्ष...तुम्हाला आवडेल आणि सहभागी व्हायला मजा येईल अशी ही स्पर्धा म्हणजेच, ‘बहुरंगी बहर’- उमलणारे व्यक्तित्त्व स्पर्धा!

5 Sample Preview Questions

१६. तुझे छंद कोणते? विशेषतः कंटाळा आल्यावर, दमल्यावर काय केल्याने तू फ्रेश होतोस/होतेस? (कमाल शब्दमर्यादा ३०)

२४. तुझ्या आवडत्या मालिकेचा महाएपिसोड किंवा रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नेमका परीक्षेच्या आदल्या दिवशी आहे. तुला तो कार्यक्रम बघावासा वाटतोय. मात्र अभ्यास तर केलाच पाहिजे.. अशा परिस्थितीत तू नेमके काय करशील? (कमाल शब्दमर्यादा ५०)

३४. कल्पना कर की, तुझं फेसबुकवर/ इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे आणि तुझ्या कुटुंबातील काही व्यक्तीही त्या माध्यमात आहेत. तर तू तुझ्या फ्रेंडलिस्टमध्ये त्यांना स्थान देशील का? कारणासह लिही. (कमाल शब्दमर्यादा ४०)

३६. पर्यावरण निर्देर्शाकात भारताचा क्रमांक १८० पैकी १७७ वा आहे. भारताचे स्थान वर सरकून ते किमान १७० वर यावे यासाठी तू स्वत: कोणती कृती करशील, जेणेकरून तुझा खारीचा वाटा आपल्या देशाला मिळेल? (कमाल शब्दमर्यादा ३०)

३९. मॉल आणि स्थानिक दुकान या दोघांचा संवाद सुरू आहे, अशी कल्पना करून संवादलेखन करा. (कमाल शब्दमर्यादा ५०)

हे ५ प्रश्न वाचलेत?

असे इंटरेस्टिंग ४० प्रश्न म्हणजे 'बहुरंगी बहर' स्पर्धा !

१०० रुपये भरून नाव नोंदवा आणि प्रश्नावली डाउनलोड करा.

१५ ऑगस्टच्या आधी उत्तरं पाठवा !

*स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क १०० ₹ फक्त

या उपक्रमात नक्की सहभागी व्हा. संपूर्ण प्रश्नावली सोडवा. त्यानिमित्ताने तुम्ही स्वतःला नीट ओळखू लागाल. अधिक माहितीसाठी कॉल करा: ०२२- २५९८६२७० / ७१ / ७२ / ७३ - किंवा

ई-मेल करा: - iphwayamspardha17@gmail.com

विद्यार्थ्यांच्या उमलत्या वयामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध बहरते पैलू समजापुढे यावे हा 'बहुरंगी बहर'च्या संकप्लनेमागे एक उद्देश आहे. आम्हाला विश्वास आहे की, बहुरंगी बहर मध्ये सहभागी झालेली मुले पुढे समाजाला भूषण ठरणार आहेत.