• IPH helpline number

    HelpLine: +91-22-25385447

    "Emotional First Aid" helpline.

"पिंपळपान" - ज्येष्ठांसाठी अनोखी स्पर्धा

फक्त वयाने ज्येष्ठ(६५+) पण मनाने तरुण असणाऱ्यांसाठी एक खास व्यक्तिमत्व स्पर्धा. आतापर्यंतच्या तुमच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये *पिंपळपान* या स्पर्धेद्वारे अजून एक मानाचा तुरा..... तुम्हाला आम्ही दिलेला फॉर्म भरून द्यायचा आहे. यानंतर निवडक स्पर्धकांचा ग्रुप डिस्कशन राऊंड होईल.... आणि मग यातून निवडलेल्या १० स्पर्धकांचा थेट काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात फायनल राऊंड.....१ फेब्रुवारी पासून IPH व सप्तसोपान येथे व वेबसाईट वरही फॉर्म्स उपलब्ध होतील...

(Group discussion:4 April 2020 Final round 5 April 2020)

संपर्क: उर्वी- 8291982566 भारती- 8291982568

सूचना : प्रश्नावली भरण्यापूर्वी

१. प्रश्नावली मराठी किंवा इंग्रजीत भरू शकता पण पुढील दोन्ही फेऱ्या मराठीत आहेत.

२. स्पर्धा मराठी बोलू शकणाऱ्या सर्वांसाठी खुली आहे आणि पुढील फेऱ्यांसाठी निवड झाल्यास ठाण्याबाहेरील स्पर्धकांनी राहण्याची सोय स्वतःच करावयाची आहे.

३. व्यक्तिगत माहिती, वैद्यकीय व प्रश्नावली माहिती हे तिन्ही फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

४. फॉर्म देताना सोबत १०० रु. शुल्क द्यावे .

५. सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्न क्रमांक स्पष्ट अक्षरात लिहून वेगळया कागदांवर लिहावयाची आहेत.

६. फॉर्म भरून देताना त्यासोबत आधार कार्डची कॉपी जोडावी.

७. फॉर्म भरून देण्याची शेवटची तारीख १ मार्च २०२०  

5 Sample Preview Questions

१ . तुमचे आवडते ३ चित्रपट व आवडण्याची कारणे .

२. तुमची आवडती ३ पुस्तके व आवडण्याची कारणे:

३ . स्मार्ट फोन वापरता काय ? होय / नाही .
होय असल्यास कश्यासाठी ?
फोन घेणे व करणे / संदेश करणे /देवनागरी लिपीत/ गुगलवर माहिती शोधणे / यंत्रणेसाठी/ संदेश रेकॉर्ड करून पाठवणे /गाणी , चित्रे डाउनलोड करणे .

४ . आज उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांपैकी ( मुदत ठेव , शेअर्स , बॉण्ड्स ,सोने , स्थावर इ . पैकी ) कोणती गुंतवणूक तुम्हाला सुरक्षित व लाभदायक वाटते व का?

५ . देवधर्म , कर्मकांड , पूजाअर्चा इ. चे तुमचया दैनंदिन आयुष्यात काय स्थान आहे ?

हे ५ प्रश्न वाचलेत?

१०० रुपये भरून नाव नोंदवा आणि प्रश्नावली डाउनलोड करा.

१ मार्च २०२० आधी उत्तरं पाठवा !